मनापासून मनापर्यंत. ..!
Monday, January 30, 2017
Wednesday, January 18, 2017
Saturday, December 31, 2016
Saturday, December 3, 2016
राज्यस्तरीय दिर्घकथा प्रतियोगिता
"मनापासून मनापर्यंत. ..!"
आयोजित
--O राज्यस्तरीय दिर्घकथा प्रतियोगिता O--
"मनापासून मनापर्यंत. ..!" आणि Marathi Poetry Slam आयोजित राज्यस्तरीय दिर्घकथा प्रतियोगितेसाठी आतापर्यंत खालील कथा पोहोचल्या आहेत. ..
१) अव्यक्त - काव्यपरी तृप्ती अशोक काळे, नागपूर.
२) जानकी - सौ मिनल प्रदिप कुलकर्णी, नाशिक.
३) एकटी - आशा अरुण पाटील, सोलापूर.
४) प्रितीच्या सहवासात - श्रीमती लतिका चौधरी, धुळे.
५) संशोधक गण्या - रमेश सूर्यभान डोंगरे, बुलढाणा.
६) मना घडवी संस्कार - प्रा. रेखा विनायक नाबर, मुंबई.
७) आजोळं - अरविंद उचित, वाशिम.
८) जगावेगळं आईपण - डॉ. शरयू शहा.
९) तोरणा - शुभम सराफ.
१०) गंगाई - प्रवीण शांताराम म्हात्रे, पनवेल.
११) सेवाव्रती - संजय विस्तारी येरणे, चंद्रपूर.
१२) आप्पा - राजेश लक्ष्मण साबळे, ठाणे.
१३) सुन्न - प्रशांत गाडेकर, डोंबिवली.
१४) तिचं प्रगती पत्रक - रावसाहेब जाधव, चांदवड.
१५) तडजोड - संजय भिकाजी पांडे, नागपूर.
१६) पुत्र मानवाचा - अशोक स. वरूडे, अहमदनगर.
१७) पण आता निघावं लागेल - अक्षय ताराचंद भिंगारदिवे, अहमदनगर.
१८) देव्हारा - विनिता माने (पिसाळ), पुणे.
१९) पासपोर्ट - प्रा. बी. एन. चौधरी, जळगाव.
२०) खिचडी - प्रा. बी. एन. चौधरी, जळगाव.
२१) स्वप्नपुर्ती - चैत्राली धामणकर, पुणे.
२२) दिल दोस्ती - प्रा. श्री. धनाजी जनार्दन बुटेरे, ठाणे.
२३) माणसातला देव - मारुती तु. खुडे,नांदेड.
२४) प्रवास - संदीप मोकळे.
२५) डॉ. गीता जोशी.
१९) पासपोर्ट - प्रा. बी. एन. चौधरी, जळगाव.
२०) खिचडी - प्रा. बी. एन. चौधरी, जळगाव.
२१) स्वप्नपुर्ती - चैत्राली धामणकर, पुणे.
२२) दिल दोस्ती - प्रा. श्री. धनाजी जनार्दन बुटेरे, ठाणे.
२३) माणसातला देव - मारुती तु. खुडे,नांदेड.
२४) प्रवास - संदीप मोकळे.
२५) डॉ. गीता जोशी.
◆ ◆◆
Marathi Poetry Slam साठी ई-पुस्तकांच्या प्रकाशनास मदत. ..
( Marathi Poetry Slam साठी खालील ई-पुस्तकांच्या प्रकाशनास मदत )
डाउनलोड लिंक : "अनामिका" विशाल इंगळे
"अनामिका" हा विशाल इंगळे यांचा कवितासंग्रह प्रकाशित करताना अत्यंत आनंद होत आहे. Marathi Poetry Slam (मनापासून मनापर्यंत. ..!) तर्फे प्रकाशित होणारं हे पहिलंच ई-बुक. या छोट्याश्या काव्यसंग्रहात एकूण १९ निवडक मराठी कविता आहेत. वाचकांना या कविता नक्कीच आवडतील अशी आशा करतो.
डाउनलोड लिंक : "अनामिका" विशाल इंगळे
वर दिलेल्या लिंक वरून हे ई-बुक डाउनलोड करता येईल.
Marathi Poetry Slam (मनापासून मनापर्यंत. ..!) तर्फे प्रकाशित तीन दर्जेदार कवितासंग्रह. ..
प्रकाश म्हसवेकर यांच्या दर्जेदार कविता, चारोळ्या आणि गझलांचा "एकांत". ..
डाउनलोड लिंक : "एकांत" प्रकाश म्हसवेकर
पुण्याच्या उद्योजिका चैत्राली धामणकर यांच्या मनातून उतरलेल्या
शब्दांतून साकारलेला चारोळीसंग्रह "रातराणी". ..
डाउनलोड लिंक : "रातराणी" चैत्राली धामणकर
आणि
प्रशिक गणवीर या नवकवींच्या लेखणीतून साकारलेला "पियु". ..
डाउनलोड लिंक : "पियु" प्रशिक गणवीर
कविता आणि गाण्यांची सदाबहार "काव्य मैफिल". ..
कविता आणि गाण्यांची सदाबहार "काव्य मैफिल"
(मैफिलीला विदर्भस्तरीय कार्यक्रमाचा रंग)
अमरावती : Marathi Poetry Slam व मनापासून मनापर्यंत. ..! च्या वतीने दिनांक १९ जून २०१६ रोजी अमरावती येथे कवितांनी आणि गीत-गायनांनी सजलेली "काव्य मैफिल" आयोजित करण्यात आली होती. नागपूर, यवतमाळ, वाशिम, अकोला व अमरावती अशा वेगवेगळ्या ठिकाणांहून अनेक कवी व साहित्य-प्रेमींनी उपस्थित राहून मैफिलीला विदर्भ स्तरीय कार्यक्रमाचा रंग दिला. जेष्ठ कवी तुषार जोशी व डॉ. उज्वल बारंगे यांनी काव्य सादरीकरणासोबतच सर्व नवकवींना अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. या काव्यमैफिलीची हि काही क्षणचित्रे.
Marathi Poetry Slam साठी संगीतबद्ध कवितांच्या निर्मितीस मदत. ..
( Marathi Poetry Slam साठी खालील संगीतबद्ध कवितांच्या निर्मितीस मदत )
मनापासून मनापर्यंत. ..!
काव्य : विपुल वर्धे
येशील का?
पेनाच्या शाईवर?
कोऱ्या कागदाच्या वहीवर?
उतरशील का निर्मळ
कवितांच्या ओळींवर?
येशील का?
प्रितीच्या गाण्यांवर?
आठवणीतल्या पावसावर?
उतरशील का निर्मळ
हिरव्या दवबिंदूंवर?
येशील का?
हसण्यातल्या खळीवर?
रुसलेल्या आसवांवर?
उतरशील का निर्मळ
पाणावलेल्या डोळ्यांवर?
येशील का?
थांबलोय मी,
अश्रू तुझे पुसायला,
तुला आणखी रुसवायला,
माझ्या मध्ये मिळवायला,
बाकी शून्य उरायला. ..
येशील का? येशील का? ?
www.MarathiPoetrySlam.blogspot.in
मनापासून मनापर्यंत. ..!
काही काही पानं
कोरीच बरी असतात. ..
म्हणूनंच पुस्तकातलं
कुठलं न कुठलं पान कोरंच असतं. ..
मी पण एक पान कोरंच ठेवलं होतं. ..
मुद्दामच. ..!
पण आज रहावलंच नाही. ..
उठलो आणि ओरखडल्या,
आयुष्याच्या कोऱ्या कागदावर
रात्रीतल्या आठवणींच्या सावल्या. ..!
लिहिल्यावर वाटलं
पान जरा जास्तच काळं झालंय कदाचित. ..
काही शब्द खोडावी म्हंटलं
आणि ओढल्या उभ्या आडव्या रेषा. ..!
ऐवढी खोडताड?
आता फक्त पान राहिलंय
फाडून फेकन्याच्या लायकिचं. ..
फाडून गोळा केला आणि दिलं फेकून
कचरापेटीत. ..
फाटलेलं पुस्तक कोण हाती घेइल?
कोण वाचणार या छिन्नविछिन्न अवस्थेतील
विस्कटलेली कविता. ..?
देवाजवळच्या दिव्यावर अचानक लक्ष गेलं. ..
आणि पेटवली चिता
पुस्तकाच्या एक एका पानाची. ..
आता त्या कोऱ्या पानांवर
कधीच लिहिणार नाही. ..
सांगणार ही नाही कुणाला
देवघरातल्या कागदाच्या राखेची कहानी. ..
काही पानं जशी असतात तशीच बरी
असतात. ..
कोरीच. ..!
त्या पानावरचे शब्द
फक्त लिहिणाऱ्यासाठी असतात. ..
पानावर नाही,
मनावर कोरलेले. ..! !!
मनापासून मनापर्यंत. ..!
मनापासून मनापर्यंत. ..!
काव्य : विशाल इंगळे
काही काही पानं
कोरीच बरी असतात. ..
म्हणूनंच पुस्तकातलं
कुठलं न कुठलं पान कोरंच असतं. ..
मी पण एक पान कोरंच ठेवलं होतं. ..
मुद्दामच. ..!
पण आज रहावलंच नाही. ..
उठलो आणि ओरखडल्या,
आयुष्याच्या कोऱ्या कागदावर
रात्रीतल्या आठवणींच्या सावल्या. ..!
लिहिल्यावर वाटलं
पान जरा जास्तच काळं झालंय कदाचित. ..
काही शब्द खोडावी म्हंटलं
आणि ओढल्या उभ्या आडव्या रेषा. ..!
ऐवढी खोडताड?
आता फक्त पान राहिलंय
फाडून फेकन्याच्या लायकिचं. ..
फाडून गोळा केला आणि दिलं फेकून
कचरापेटीत. ..
फाटलेलं पुस्तक कोण हाती घेइल?
कोण वाचणार या छिन्नविछिन्न अवस्थेतील
विस्कटलेली कविता. ..?
देवाजवळच्या दिव्यावर अचानक लक्ष गेलं. ..
आणि पेटवली चिता
पुस्तकाच्या एक एका पानाची. ..
आता त्या कोऱ्या पानांवर
कधीच लिहिणार नाही. ..
सांगणार ही नाही कुणाला
देवघरातल्या कागदाच्या राखेची कहानी. ..
काही पानं जशी असतात तशीच बरी
असतात. ..
कोरीच. ..!
त्या पानावरचे शब्द
फक्त लिहिणाऱ्यासाठी असतात. ..
पानावर नाही,
मनावर कोरलेले. ..! !!
www.MarathiPoetrySlam.blogspot.in
मनापासून मनापर्यंत. ..!
काव्य-वाचन : पियुष वानखडे
वाटतं एक दिवस आयुष्य
कारण नसताना घालवावं...
फिरत रहावं असंच उनाडकं
डोंगर रानातून...
चालत रहावं
धाड धाड
कशाचीही पर्वा न करता...
बघावं किती तापतोय सूर्य
रागाच्या भरात...
किती चटके देईल ही माती...
किती ताकद आहे वाऱ्यात...
एक दिवस जगावं
तत्व बित्व सोडून...
एक दिवस बघावं प्रवाहाच्या
उलट्या दिशेनं पोहून...
चन्द्र,सूर्य,वादळ,वारा यांना
कंटाळलोय मी फार...
स्वतःसाठीही एक कविता
करावीशी वाटते यार...
कारण नसताना घालवावं...
फिरत रहावं असंच उनाडकं
डोंगर रानातून...
चालत रहावं
धाड धाड
कशाचीही पर्वा न करता...
बघावं किती तापतोय सूर्य
रागाच्या भरात...
किती चटके देईल ही माती...
किती ताकद आहे वाऱ्यात...
एक दिवस जगावं
तत्व बित्व सोडून...
एक दिवस बघावं प्रवाहाच्या
उलट्या दिशेनं पोहून...
चन्द्र,सूर्य,वादळ,वारा यांना
कंटाळलोय मी फार...
स्वतःसाठीही एक कविता
करावीशी वाटते यार...
www.MarathiPoetrySlam.blogspot.in
नको उभारु असा दुरावा एक फोन कर...!
ठरेल खोटा तुझाच दावा एक फोन कर...!
असे कशाला एक-एकटे झुरायचे तू..?
अर्धा वाटा मला मिळावा एक फोन कर...!
नकोस बोलू एक शब्दही फक्त रिंग दे...
तुझा अबोला मला कळावा एक फोन कर...!
म्हणायची हक्काने मजला घरी निघुन ये...
पुन्हा येवुदे तसा बुलावा एक फोन कर...!
क्षणोक्षणी मी तुझी आठवण काढत असते
ह्या गोष्टीला काय पुरावा? एक फोन कर...!
मनापासून मनापर्यंत. ..!
गायन : महेश देशमुख
काव्य : रुपेश देशमुख
नको उभारु असा दुरावा एक फोन कर...!
ठरेल खोटा तुझाच दावा एक फोन कर...!
असे कशाला एक-एकटे झुरायचे तू..?
अर्धा वाटा मला मिळावा एक फोन कर...!
नकोस बोलू एक शब्दही फक्त रिंग दे...
तुझा अबोला मला कळावा एक फोन कर...!
म्हणायची हक्काने मजला घरी निघुन ये...
पुन्हा येवुदे तसा बुलावा एक फोन कर...!
क्षणोक्षणी मी तुझी आठवण काढत असते
ह्या गोष्टीला काय पुरावा? एक फोन कर...!
www.MarathiPoetrySlam.blogspot.in
Subscribe to:
Posts (Atom)
"सायली"
एकूण २८ कविंच्या लेखणीतून साकारलेला कवितासंग्रह. .. सा य ली . .. आतापर्यंतचा पहिला आणि एकमेव शब्दाधारीत काव्यप्रकार. .. (पुस्तक उघडण्यासाठी...
-
मनापासून मनापर्यंत. ..! च्या सर्व वाचकांसाठी नविन वर्षाची भेट. .. “बालाजी लखने” यांच्या लेखणीतून साकारलेला २५ निवडक प्रेम कवितांचा. .. “तुझ...
-
( Marathi Poetry Slam साठी खालील ई-पुस्तकांच्या प्रकाशनास मदत ) डाउनलोड लिंक : "अनामिका" विशाल इंगळे " अ नामिका " हा ...
-
नमस्कार मित्रांनो, "मनापासून मनापर्यंत. ..!" च्या पुर्ण टिम तर्फे आपलं सहर्ष स्वागत. .. जेमतेम ७-८ जन मिळुन तयार झालेली हि आमची छो...