Saturday, December 3, 2016

"मनापासून मनापर्यंत. ..!"

नमस्कार मित्रांनो,

"मनापासून मनापर्यंत. ..!" च्या पुर्ण टिम तर्फे आपलं सहर्ष स्वागत. ..

जेमतेम ७-८ जन मिळुन तयार झालेली हि आमची छोटिशी टीम. .. या टिम मध्ये कुणीही प्रोफेशनली लेखक किंवा कवी वगैरे नाही. .. तुमच्या सारख्याच बर्र्याच वाचकांपैकि आम्हि पण काहि लोक. ..

राहुल, विक्की आणि मी (विशाल), आम्ही अतिशय जिवलग मित्र. .. जेवढ्या दिवसांचं आमचं आयुष्य, तेवढ्याच दिवसांची आमची मैत्री. .. आणि आमची टिम GD. ..

आम्हि म्हणजे फार चिल्लर लोकं. .. आयुष्याच्या रस्त्यावर चालता चालता आमच्या सारखेच काहि सोबती मिळाले. .. आणि हि चिल्लर संख्या वाढत गेली. .. टिम च्या प्रत्येक व्यक्तिची स्वतहाची एक विशेष शैली आहे. .. आणि त्यामुळेच आम्हि सर्व एकत्र बांधल्या गेलो. ..

साहित्याशी सगळ्यांचं नातं तसं फार दुरचंच, कधी कधी ओठांवर येणारे शब्द कागदावर उतरवायचे. .. आणि आपापसांत एकमेकांना ऐकवायचे. .. तेवढ्याच दोन चार लोकांकडुन मग थोडि प्रशंसा करवुन घ्यायची आणि नंतर साल्यांकडुनच इज्जतीचे धिंदवडे काढुन घ्यायचे. .. तेवढ्यातच आम्हि समाधानी. ..

इंटरनेटच्या जाळ्यावर ई-साहित्याच्या नव्या जगाची ओळख झाली. .. काहि दिवसांअगोदर मी टिम समोर ई-मॅगझिन ची संकल्पना मांडली. .. सर्वांनी अपेक्षित प्रतिसाद दिला आणि "मनापासून मनापर्यंत. ..!" या आमच्या पहिल्या वहिल्या ई-मॅगझिन निमित्त ई-साहित्याच्या या क्षेत्रात आम्हि पाउल टाकलं. ..

"मनापासून मनापर्यंत. ..!" बद्दल सांगायचं म्हणजे हिंदी-मराठि साहित्याची एक छोटिशी संकलिका. .. विशेष आमच्या सारख्याच साहित्य प्रेमी लोकांसाठि, मुख्यत: युवा वर्गासाठि. ..!

आमच्या सारख्याच कधी कधी लिहिणार्र्या सर्व चिल्लर लोकांचं "मनापासून मनापर्यंत. ..!" मध्ये मनापासून स्वागत. ..

आपल्या मनात चालणारी चुळबूळ कागदावर उतरवा. .. आणि आमच्या पर्यन्त पाठवा. .. आम्ही ती पोहोचवू. ..

मनापासून मनापर्यंत. ..!

No comments:

Post a Comment

"सायली"

एकूण २८ कविंच्या लेखणीतून साकारलेला कवितासंग्रह. .. सा य ली . .. आतापर्यंतचा पहिला आणि एकमेव शब्दाधारीत काव्यप्रकार. .. (पुस्तक उघडण्यासाठी...